ब्रेकिंगमहाराष्ट्र
रिन्यू पॉवरच्या विद्युत पोल प्रकरणात मोठा ट्विस्ट; चिकुंद्रा येथील दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर
रिन्यू पॉवरच्या विद्युत पोल प्रकरणात मोठा ट्विस्ट; चिकुंद्रा येथील दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर

0
7
6
5
0
5
रिन्यू पॉवरच्या विद्युत पोल प्रकरणात मोठा ट्विस्ट; चिकुंद्रा येथील दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर
तुळजापूर : चिकुंद्रा येथील बहुचर्चित रिन्यू पॉवर विंडमिल कंपनीच्या विद्युत पोल नुकसान प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गायकवाड आणि विजय गरड यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामुळे पवनचक्की प्रकल्प, शेतकरी आणि कंपनी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकुंद्रा परिसरात रिन्यू पॉवर विंडमिल कंपनीकडून कोट्यवधी रुपयांच्या पवनचक्की प्रकल्पाचे काम सुरू असून शेतकऱ्यांशी करार करून त्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. दरम्यान, दि. १५ मे २०२६ रोजी मौजे चिंचपूर येथे कंपनीच्या विद्युत वाहिनीच्या पोलचे नुकसान झाल्याप्रकरणी दत्तात्रय गायकवाड व विजय गरड यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.कंपनीच्या तक्रारीनुसार,आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने विद्युत वाहिनीचे पोल पाडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच पोलमधून वीजप्रवाह सुरू असताना ही कारवाई करण्यात आल्याने जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात नंतर वीज कायद्यातील कलमांचाही समावेश करण्यात आला.
दरम्यान, जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींच्यावतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. रिन्यू पॉवर कंपनी शेतकऱ्यांशी करार करूनही त्यांना योग्य मोबदला देत नसून सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. कंपनीच्या मनमानीविरोधात आवाज उठवल्यामुळेच आरोपींना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोपही बचाव पक्षाने केला.
तसेच आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करतील, असा मुद्दा बचाव पक्षाने मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. अमित गोळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. संकेत गोरे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, ॲड. पृथ्वीराज खोचरे आणि महेश पवार यांनी सहकार्य केले.या जामीन आदेशामुळे परिसरात नव्या चर्चांना उधाण आले असून शेतकरी व कंपनी यांच्यातील वाद आता कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
7
6
5
0
5



