एस.टी. कर्मचाऱ्यांचे कळंब आगारासमोर घंटानाद आंदोलन!
एस.टी. कर्मचाऱ्यांचे कळंब आगारासमोर घंटानाद आंदोलन!
एस.टी. कर्मचाऱ्यांचे कळंब आगारासमोर घंटानाद आंदोलन!
कळंब : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, राज्यभर तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर कळंब आगारातील कर्मचाऱ्यांनी तसेच संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी बस आगारासमोर घंटानाद आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.
या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी “हक्क मिळाला पाहिजे”, “आर्थिक न्याय द्या”, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, कास्ट्राईब संघटना तसेच संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान येत्या १३ ऑक्टोबरच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या वेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन आगारप्रमुख एस. डी. खताळ यांना देण्यात आले.
या प्रसंगी उमाकांत गायकवाड, महेश थोरबोले, महादेव देटे, आर. जी. भिसे, ए. जे. शेख, रत्नाकर जोशी, सुभाष बारकुल, मनोज मुळीक, चेतन गोसावी, रतन लोहार, सायस खराटे, बाबा धावारे, सुबोध रणदिवे, गणेश गोरे, डिसले यांच्यासह सर्व संघटनांचे प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



