Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अमीर शेख यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश; तुळजापूरच्या राजकारणात खळबळ

0 7 6 5 0 5

अमीर शेख यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश; तुळजापूरच्या राजकारणात खळबळ

तुळजापूर : प्रतिनिधी

समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

या वेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे, सुनील चव्हाण, नितीन काळे, माजी सभापती सचिन पाटील, आनंद कंदले, नळदुर्ग उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निहाल काझी, अमर हंगरगेकर, माजी सरपंच शंकर गोरे, मोहसीन बागवान, रहेमान काझी, अभिजीत लोके यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रवेश सोहळ्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अमीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपची विकासाभिमुख भूमिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तसेच सर्वसामान्यांना न्याय देणारे नेतृत्व यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे अमीर शेख यांनी सांगितले.
या प्रवेशामुळे तुळजापूर मतदारसंघात भाजपचे संघटन अधिक मजबूत होणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे