ब्रेकिंगमहाराष्ट्र
सचिन घाटे यांना पीएच.डी. पदवी प्रदान;तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्राला मानाचा तुरा

0
7
6
4
9
7
सचिन घाटे यांना पीएच.डी. पदवी प्रदान;तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्राला मानाचा तुरा
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर येथील रहिवासी सचिन मोहनराव घाटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्राणीशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्राला मोठा मान मिळाला आहे.
सचिन घाटे यांनी
“Ecosystem Based Seasonal Fisheries Investigation of Kalegaon Reservoir of Osmanabad District (M.S.) India”
या विषयावर आपला संशोधन प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. काळेगाव धरणातील मत्स्यसंपदेचा अभ्यास, जैवविविधता व पर्यावरणीय समतोल यावर आधारित हे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
या संशोधन कार्यासाठी मत्स्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य व संशोधक मार्गदर्शक प्रा. डॉ. शिवाजी जेठीथोर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल माजी मंत्री तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकररावजी चव्हाण, सचिव उल्हास (दादा) बोरगावकर, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्रो. डॉ. विश्वास साखरे, प्रा. संभाजी भोसले, एस.एम.डी.एम. महाविद्यालय कळंबचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, प्रो. डॉ. ज्ञानेश चिंते, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूरचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रविण भाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सचिन घाटे यांच्या या यशामुळे तुळजापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, नव्या संशोधकांना यामुळे प्रेरणा मिळणार आहे.

0
7
6
4
9
7



