ब्रेकिंगमहाराष्ट्र
काक्रंबा गटात ढवळेंच्या बाजूने राजकीय वारे; शिवसेनेच्या प्रचाराला निंबाळकरांच्या सभेची धार
मिनी मंत्रालयावर लक्ष; काक्रंबा गटात ॲड. ढवळेंच्या बाजूने राजकीय वारे

0
7
6
4
9
7
काक्रंबा गटात ढवळेंच्या बाजूने राजकीय वारे; शिवसेनेच्या प्रचाराला निंबाळकरांच्या सभेची धार
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काक्रंबा जिल्हा परिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा प्रचार अधिक वेग घेताना दिसत आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या गटातून उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले ॲड. रामचंद्र ढवळे यांच्या बाजूने राजकीय वातावरण अनुकूल होत चालले आहे. स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनतेच्या प्रश्नांशी असलेली थेट नाळ यामुळे ढवळेंना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सलगरा दिवटी येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भव्य जाहीर सभेमुळे प्रचाराला निर्णायक कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या सभेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची दिशा, विकासाचा ठोस आराखडा आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न मांडले जाणार असून, त्याचा थेट फायदा ॲड. ढवळे यांच्या प्रचाराला होणार असल्याचे चित्र दिसत आहे.काक्रंबा गटातील १६ गावांमध्ये मतदारांशी थेट संवाद, बैठका आणि प्रचार फेऱ्यांमुळे ॲड. ढवळे यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे. शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य संचारले असून, ही निवडणूक विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे काक्रंबा गटात ॲड. रामचंद्र ढवळे यांच्या बाजूने राजकीय वारे जोरात वाहू लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.
0
7
6
4
9
7



