ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर शहरात पोलिसांची ताकद दाखवणारा दणदणीत रूटमार्च; निवडणुकीत शांततेचा संदेश
तुळजापूर शहरात पोलिसांची ताकद दाखवणारा दणदणीत रूटमार्च; निवडणुकीत शांततेचा संदेश
0
7
6
5
0
5
तुळजापूर शहरात पोलिसांची ताकद दाखवणारा दणदणीत रूटमार्च; निवडणुकीत शांततेचा संदेश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख तसेच तोडफोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायं. ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान तुळजापूर शहरात भव्य रूटमार्च काढण्यात आला.

निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या रूटमार्चमध्ये एकूण ०४ अधिकारी, २५ पोलिस अंमलदार, ४७ होमगार्ड, तसेच एस.आर.पी.एफ. च्या ०१ सेक्शनचा सहभाग होता. यामध्ये १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक व ६० अंमलदार उपस्थित होते.

शहरातील प्रमुख मार्गांवरून सज्ज दलासह झालेल्या या संचलनामुळे निवडणुकीत शांतता राखावी असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0
7
6
5
0
5



