Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा तुळजापूर विधीज्ञ संघाकडून तीव्र निषेध

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला एकमताने पाठिंबा; तोडगा न निघाल्यास थेट दिल्लीत आंदोलनात उतरण्याचा ठराव

0 8 5 6 2 9

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा तुळजापूर विधीज्ञ संघाकडून तीव्र निषेध

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला एकमताने पाठिंबा; तोडगा न निघाल्यास थेट दिल्लीत आंदोलनात उतरण्याचा ठराव

तुळजापूर : प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचे पडसाद आता तुळजापुरातही उमटले आहेत. विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करून त्यांना जखमी करण्यात आल्याचा आरोप करत तुळजापूर विधीज्ञ संघाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. विद्यार्थी आंदोलनाला एकमताने पाठिंबा देतानाच या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास दिल्ली येथे जाऊन आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तुळजापूर विधीज्ञ संघाची दि. २४ जुलै रोजी ॲड. संजय एच. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एन. एम. कानडे आणि ॲड. आर. डी. ढवळे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातील विषय मांडले. त्यास ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अंगद एस. पवार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित विधीज्ञांनी सर्वानुमते ठराव मंजूर केला.

‘विद्यार्थ्यांवर बळाचा वापर निषेधार्ह!’

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कथितरीत्या झालेल्या लाठीमाराबाबत बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत विधीज्ञ संघाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या पाठीशी विधीज्ञ संघ; गरज पडल्यास दिल्ली गाठणार!

तुळजापूर विधीज्ञ संघाने विद्यार्थी आंदोलनाला एकमताने पाठिंबा जाहीर करत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता, आंदोलनातील प्रश्नावर तोडगा न निघाल्यास तुळजापूरचे विधीज्ञ थेट दिल्ली येथे जाऊन आंदोलनात सहभागी होतील, असा ठरावही बैठकीत करण्यात आला.

या ठरावाची प्रत धाराशिव जिल्हाधिकारी, तुळजापूर तहसीलदार आणि तुळजापूर पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता तुळजापूरच्या विधीज्ञांनीही पाठबळ दिल्याने या आंदोलनाच्या समर्थनाचा आवाज आणखी बुलंद झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे