Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नगरपरिषदेतल्या भ्रष्टाचारावर शिंदे गटाचा निशाणा – स्वबळावर मैदानात उभ्या धारदार पाच तलवारी ;नगराध्यक्ष पदाला पाठिंबा? – शिंदे गटाचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे – अमोल जाधव

0 7 6 5 0 5

नगरपरिषदेतल्या भ्रष्टाचारावर शिंदे गटाचा निशाणा – स्वबळावर मैदानात उभ्या धारदार पाच तलवारी

नगराध्यक्ष पदाला पाठिंबा? – शिंदे गटाचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे – अमोल जाधव

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दोन डिसेंबरला होणाऱ्या तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपसोबत युती न झाल्याने स्वबळावर जोरदार प्रवेश केला आहे. भाजपने नगरसेवकांच्या २३ही जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त करत शिंदे गटाने तीन प्रभागांत पाच उमेदवार रिंगणात उतरवले असून विजयी होण्याचा দৃढ निर्धार केल्याची माहिती तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली.

तालुकाध्यक्ष अमोल जाधव म्हणाले की, “शहराच्या विकासाबाबत उदासीनता व नगरपरिषदेत वाढलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढत आहे. भाजप–शिंदे गट–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने आम्ही स्वतंत्र मार्ग स्वीकारला.”

शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार :

प्रभाग १ : सुनिता प्रभाकर पाटील

प्रभाग २ : मीनाताई रामचंद्र सोमाजी, अजिंक्य खंदारे

प्रभाग ८ : सुनील हनुमंत घाडगे, सुनिता अविनाश रसाळ

या सर्व प्रभागांत दररोज गाठीभेटी, पदयात्रा आणि डोअर-टू-डोअर प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

नगराध्यक्ष पदाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत वरिष्ठ नेते घेणार असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरच अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.तुळजापूर नगरपालिकेत शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात अजूनही औपचारिक युती न झाल्याने आम्ही स्वतंत्र लढत आहोत, असेही जाधव यांनी ठामपणे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे