Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कुंकवाची उधळण, संबळाचा निनाद अन् ‘आई राजा उदो-उदो’चा गजर! तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा भक्तिभावात संपन्न

१०८ सुती साड्यांचे संरक्षक कवच; सीमोल्लंघनानंतर आई तुळजाभवानी श्रमनिद्रेत, २६ ऑक्टोबरला पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार

0 8 5 6 3 1

कुंकवाची उधळण, संबळाचा निनाद अन् ‘आई राजा उदो-उदो’चा गजर! तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा भक्तिभावात संपन्न

१०८ सुती साड्यांचे संरक्षक कवच; सीमोल्लंघनानंतर आई तुळजाभवानी श्रमनिद्रेत, २६ ऑक्टोबरला पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

कुंकवाची मुक्त उधळण, संबळाचा निनाद आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषाने श्री क्षेत्र तुळजापूर बुधवारी पहाटे दुमदुमून गेले! महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा धार्मिक विधी आणि भक्तांच्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानंतर देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ झाला असून, सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी पहाटे देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहेत.

पहाटे देवीची पूजा व आरती झाल्यानंतर मूळ मूर्तीला १०८ सुती साड्यांची पिळे (दिंड) नेसवून संरक्षक कवच तयार करण्यात आले. त्यानंतर देवीची मूर्ती पालखीत विराजमान करून मंदिराबाहेर आणण्यात आली. मंदिराभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून परिसरातील पिंपळाच्या पारावर पालखी ठेवण्यात आली. तेथे आरती, साखरभाताचा नैवेद्य आणि मानाच्या आरत्या पार पडल्या.

◾श्रमनिद्रेस प्रारंभ; भाविकांना सिंहासनारोहणाची प्रतीक्षा!

महिषासुराशी नऊ दिवस युद्ध करून देवीने त्याचा वध केला, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या युद्धानंतर देवी विश्रांतीसाठी मंचकी निद्रेत जाते, तिला ‘श्रमनिद्रा’ म्हटले जाते. सीमोल्लंघनानंतर देवीची मूर्ती सिंहाच्या गाभाऱ्यातील मानाच्या तेली लाकडी पलंगावर विराजमान करण्यात आली.

ही श्रमनिद्रा २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, आश्विनी पौर्णिमेला पहाटे देवी सिंहासनावर विराजमान होणार आहेत.

◾मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, व्यवस्थापक माया माने, मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी, महंत, पुजारी मंडळांचे पदाधिकारी, सेवेकरी, मानकरी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

परंपरेचा जागर, भक्तीचा गजर आणि आईच्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्याने तुळजापूरच्या धार्मिक वैभवाची पुन्हा प्रचिती दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे