Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

काक्रंबा गटासाठी भाजपचा उच्चशिक्षित प्रभावी चेहरा; दयानंद शिंदेंना उमेदवारी

काक्रंबा गटासाठी भाजपचा उच्चशिक्षित प्रभावी चेहरा; दयानंद शिंदेंना उमेदवारी

0 7 6 5 0 5

काक्रंबा गटासाठी भाजपचा उच्चशिक्षित प्रभावी चेहरा; दयानंद शिंदेंना उमेदवारी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद काक्रंबा गटासाठी भारतीय जनता पार्टीने दयानंद मनोहर शिंदे यांची उमेदवारी निश्चित केली असून, पक्षाने एक निष्ठावान, तळागळातील कार्यकर्ता आणि प्रभावी संघटनकर्ता मैदानात उतरवल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. दयानंद शिंदे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करताना अनेक विद्यार्थी हिताच्या आंदोलनांचे नेतृत्व केले. पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार-प्रसार करत संघटनात्मक कामात ठसा उमटवला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, राष्ट्रीय विचारसरणीचे काम सातत्याने करत आले आहेत.

त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मसला (ता. तुळजापूर) येथील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पदापासून झाली. ग्रामीण समाजजीवनाची जाण, तळागळातील जनतेच्या समस्या जवळून पाहण्याचा अनुभव आणि प्रखर वक्तृत्व हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे यांनी काक्रंबा गटात पक्षाची मजबूत मोर्चाबांधणी करत घरोघरी संपर्क अभियान राबवले. नवीन कार्यकर्त्यांची फळी उभारून विकासाचे धोरण थेट ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ समाजसेवा व पक्षनिष्ठेच्या जोरावर त्यांनी विश्वास संपादन केला आहे.


यामुळे आमदार राणाजागजितसिंह पाटील व पक्ष नेतृत्वाने काक्रंबा जिल्हा परिषद गटासाठी दयानंद शिंदे यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास टाकला असून, आगामी निवडणुकीत ही उमेदवारी भाजपसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे