Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सिद्धिविनायक मल्टीस्टेट बँकेत गणरायाची भक्तिमय आरती; मधुकर शेळके यांच्या हस्ते पूजन!

जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक मधुकर शेळके यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीचे पूजन; बँक परिसरात भक्तिमय वातावरण

0 8 5 6 2 8

सिद्धिविनायक मल्टीस्टेट बँकेत गणरायाची भक्तिमय आरती; मधुकर शेळके यांच्या हस्ते पूजन!

जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक मधुकर शेळके यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीचे पूजन; बँक परिसरात भक्तिमय वातावरण

तुळजापूर | तुळजापूरनामा

तुळजापूर येथील सिद्धिविनायक मल्टीस्टेट बँकेत गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशमूर्तीची भक्तिभावाने आरती व पूजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन करून आरती करण्यात आली.

गणरायाच्या आरतीच्या वेळी बँक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी श्रद्धेने श्री गणेशाचे दर्शन घेत आरतीमध्ये सहभाग नोंदविला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच तुळजापूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी बँकेचे व्यवस्थापक रोहित दळवी यांच्यासह बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मक विचारांचा संदेश देण्यात आला. बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने आरतीत सहभाग घेत गणरायाचे आशीर्वाद घेतले.

श्री गणेशाच्या आरतीनंतर उपस्थितांनी परस्परांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उत्साह, श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे