Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपाइं (आठवले गट) तुळजापूरकडून तीव्र निषेध!

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपाइं (आठवले गट) तुळजापूरकडून तीव्र निषेध!

0 7 6 5 0 5

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपाइं (आठवले गट) तुळजापूरकडून तीव्र निषेध!

तुळजापूर : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.भूषण गवई यांच्यावर सुनावणीदरम्यान बूट फेकून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तुळजापूर शहर व धाराशिव जिल्हा तर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. हल्लेखोर राकेश किशोर याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या निषेधावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम, युवक जिल्हा कार्याध्यक्ष धम्मशील कदम, शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे, जिल्हा सहसचिव तानाजी कदम, तालुका कार्याध्यक्ष मनोज दांडे, ओबीसी शहराध्यक्ष घोडके, महेश इंदापुरे, संदीप (पिट्टू) कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या वतीने हा प्रकार न्यायव्यवस्थेवरील आघात असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे