Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंदुगर्जना ढोल-ताशा पथकाची भव्य पारंपरिक शिवजयंती मिरवणूक उत्साहात

हिंदुगर्जना ढोल-ताशा पथकाची भव्य पारंपरिक शिवजयंती मिरवणूक उत्साहात

0 7 6 5 0 5

तुळजापूर : दिनांक २० फेब्रुवारी रोजी हिंदुगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य आणि पारंपरिक मिरवणूक उत्साहात पार पडली. यंदा या उपक्रमाचे १३ वे वर्ष असून, या मिरवणुकीत तब्बल १३० वादक व सदस्य सहभागी झाले होते. ढोल, ताशे, झांज अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहर दुमदुमून गेले होते.

या मिरवणुकीत ४५ महिला वादकांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले. तसेच शालेय वयातील लहान मुले व मुली यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शुक्रवार पेठ येथून सुरू झालेली ही मिरवणूक आर्य चौक, कमान वेस, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, भवानी रोड मार्गे मंदिर महाद्वारासमोर समारोपास आली.मिरवणुकीत ‘शिवरायांचा दरबार’ हा भव्य देखावा साकारण्यात आला होता. मावळ्यांच्या थ्री-डी प्रतिमा शिवरायांच्या मूर्तीसमोर उभ्या करून हा देखावा साकारण्यात आला होता. शिवरायांच्या मूर्तीच्या मागे श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा ठेवण्यात आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीला उपस्थिती लावून शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे