ब्रेकिंगमहाराष्ट्र
दुष्काळाच्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करा! अरण्य गोवर्धन मठात शतचंडी यज्ञाचा धार्मिक जागर
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा सप्तपदी पाठ, होमहवन; आई जगदंबेच्या चरणी भाविकांचे साकडे

0
8
5
6
2
6
दुष्काळाच्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करा! अरण्य गोवर्धन मठात शतचंडी यज्ञाचा धार्मिक जागर
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा सप्तपदी पाठ, होमहवन; आई जगदंबेच्या चरणी भाविकांचे साकडे
तुळजापूर | तुळजापूरनामा
महाराष्ट्रावर घोंगावणारे दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि राज्यात सुख-समृद्धी नांदावी, या प्रार्थनेसह तुळजापूर येथील अरण्य गोवर्धन मठात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त दुर्गा सप्तपदी पाठ आणि शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले. विविध धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांनी मठातील वातावरण भक्तिमय झाले.

महंत व्यंकट अरण्य महाराज यांच्या हस्ते होमहवनासह विविध धार्मिक विधी पार पडले. यावेळी सुनीत पाठक, राजन पाठक, धनंजय पाठक आणि महेश प्रयाग यांनी धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दूर होऊन पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकरी बांधवांचे दुःख हलके व्हावे आणि जनजीवन पुन्हा सुरळीत व्हावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून राज्याच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी शिवाजी अमृतराव, रत्नदीप अमृतराव यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
धार्मिक विधींची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक अनुष्ठानात भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
0
8
5
6
2
6



