ब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव जिल्हा परिषद गटात मशालीचा वेग वाढला; भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका थेट मतदारांवर
वडगाव जिल्हा परिषद गटात मशालीचा वेग वाढला; भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका थेट मतदारांवर

0
7
6
5
0
5
वडगाव जिल्हा परिषद गटात मशालीचा वेग वाढला; भाजपच्या अंतर्गत वादाचा फटका थेट मतदारांवर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा वडगाव जिल्हा परिषद गट सध्या प्रचंड राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारतीय जनता पार्टी मधील अंतर्गत वाद, नाराजी आणि गटबाजीमुळे हा गट भाजपच्या हातातून निसटत चालल्याचे चित्र स्पष्ट होत असून, याचा थेट फायदा मशाल चिन्हाला होताना दिसत आहे.
भाजपप्रणीत गटाने निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच जोरदार तयारी केली होती. मात्र ऐनवेळी अपेक्षित उमेदवाराला डावलून दुसऱ्याच चेहऱ्याला तिकीट दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला.आमचा विश्वासघात झाला,अशी भावना कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करत असून,भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या नाराजीचा परिणाम थेट मतदानावर होण्याची चिन्हे ठळकपणे दिसत आहेत.भाजपच्या इच्छुकांनी अपक्ष अर्ज मागे घेतले असले, तरी त्यांच्या समर्थकांनी आता उघडपणे मशाल चालवण्याचा निर्धार केल्याची चर्चा गावोगावी रंगली आहे.दादा म्हणतायत मशाल चालवा, दादाच गुपचूप साथ देतो,असे समीकरण वडगाव गटात जोर धरू लागले आहे. परिणामी,भाजपची अंतर्गत गटबाजी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असताना मशाल मात्र संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध प्रचार आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या जोरावर आघाडी घेत असल्याचे चित्र आहे.
गावपातळीवर मशालीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,भाजपच्या नाराज गटाकडूनही अप्रत्यक्ष मदत होत असल्याने मशालीचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप, नाराजी आणि कुरघोडीचे राजकारण सुरू असताना, दुसरीकडे मशाल शांत पण आक्रमक रणनीतीने मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहे.या निवडणुकीत जाधव लक्ष्मी राजेंद्र (मशाल) आणि सरवदे पूजा सचिन (कमळ) यांच्यात थेट लढत रंगली असल्याचे चित्र असून आले आहे, वडगाव गटात आता एकच चर्चा आहे. -खरा सामना कमळ विरुद्ध मशाल असा लागला आणि सध्याच्या राजकीय समीकरणात मशाल विजयी ठरण्याची शक्यता अधिक आहे. वडगावचा हा हायव्होल्टेज ड्रामा निर्णायक वळणावर पोहोचला असून,भाजपच्या अंतर्गत भांडणाचा फटका त्यांनाच बसणार,अशी चिन्हे ठळकपणे दिसत आहेत.
0
7
6
5
0
5



