ब्रेकिंगमहाराष्ट्र
येडशीतील ‘कला केंद्र’ अनैतिक व्यापार प्रकरण; मुख्य आरोपीस अटकपूर्व जामीन ॲड.अमोल वरुडकर यांचा प्रभावी युक्तिवाद; न्यायालयाचा निर्णय
येडशीतील ‘कला केंद्र’ अनैतिक व्यापार प्रकरण; मुख्य आरोपीस अटकपूर्व जामीन ॲड.अमोल वरुडकर यांचा प्रभावी युक्तिवाद; न्यायालयाचा निर्णय

0
7
6
5
0
5
येडशीतील ‘कला केंद्र’ अनैतिक व्यापार प्रकरण; मुख्य आरोपीस अटकपूर्व जामीन ॲड.अमोल वरुडकर यांचा प्रभावी युक्तिवाद; न्यायालयाचा निर्णय
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथील ‘कला केंद्रा’च्या आडून सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यापार प्रकरणात मुख्य आरोपीस न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.अमोल वरुडकर यांनी बाजू मांडत प्रभावी युक्तिवाद केला.
प्राप्त माहितीनुसार, पुणे येथील एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत, घरगुती वादाचा फायदा घेत कामाचे आमिष दाखवून तिला येडशी येथील एका कला केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर तिला डांबून ठेवून जबरदस्तीने देहविक्रय व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासासाठी प्रकरण धाराशिव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.दरम्यान, अटकेची शक्यता लक्षात घेऊन आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणी वेळी ॲड. अमोल वरुडकर यांनी न्यायालयात मांडणी करत, आरोपीवर लावण्यात आलेले आरोप निराधार असून तपासात सहकार्य करण्याची आरोपीची तयारी असल्याचे सांगितले. तसेच कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने ॲड.वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस अटी व शर्तीस अधीन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला.या निर्णयानंतर कायदेवर्तुळात ॲड.अमोल वरुडकर यांच्या युक्तिवादाची चर्चा रंगली असून, याप्रकरणातॲड.बालाजीपोतदार,ॲड.वैभव खांडेकर,ॲड.विक्रम माने,ॲड. सचिन जाधव,ॲड.जनक साळुंखे व दीपक तुपसुंदरे यांनीही सहकार्य केले.
0
7
6
5
0
5



