ब्रेकिंगमहाराष्ट्र
भारतीय टी-२० संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांचे श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी दर्शन
मंदिर संस्थानतर्फे प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार; आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा
0
8
5
6
2
6
भारतीय टी-२० संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांचे श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी दर्शन
मंदिर संस्थानतर्फे प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार; आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
भारतीय टी-२० क्रिकेट संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर परिसरात त्यांचे भाविकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी तिलक वर्मा यांचे स्वागत करून श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व प्रसाद देत त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे ,लोकमंगल समूहाचे चे अध्यक्ष रोहन देशमुख,संचालक सचिन आडगळे,विनोद देवकर ,गजानन वडने तसेच लोकमंगल समूहाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते. मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

भारतीय संघातील युवा फलंदाज म्हणून ओळख असलेल्या तिलक वर्मा यांच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

0
8
5
6
2
6



