ब्रेकिंगमहाराष्ट्र
दुष्काळातून महाराष्ट्राला मुक्त करा; पदवीधरांच्या रणांगणात महाविकास आघाडीला विजय द्या!
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक; डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह उमेदवारांच्या विजयासाठी घातले साकडे

0
8
5
6
2
6
दुष्काळातून महाराष्ट्राला मुक्त करा; पदवीधरांच्या रणांगणात महाविकास आघाडीला विजय द्या!
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक; डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह उमेदवारांच्या विजयासाठी घातले साकडे
तुळजापूर | तुळजापूरनामा
महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय मिळू दे, असे साकडे घालत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारसभांसाठी शशिकांत शिंदे धाराशिव येथे आले होते. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे येऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून महाराष्ट्राची लवकर सुटका व्हावी, शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी देवीच्या चरणी केली.

दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रचाराला वेग दिला जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती या मुद्द्यांवर निवडणुकीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते अनिल शिंदे, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र काळे, गणेश नन्नवरे, बाळासाहेब चिखलकर, पृथ्वीराज आंधळे आदी उपस्थित होते.
0
8
5
6
2
6



