ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापुरात प्रथमच ‘दक्षिण भारतीय’ महालक्ष्मी आरास; नगरसेवक मधुकर शेळके यांच्या संकल्पनेतून बळीराजासाठी अनोखा साकडे!
दुष्काळाच्या सावटात गौरी-महालक्ष्मीचा देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू; स्वयं गौरीकडून महादेवाच्या चरणी बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

0
8
5
6
3
1
तुळजापुरात प्रथमच ‘दक्षिण भारतीय’ महालक्ष्मी आरास; नगरसेवक मधुकर शेळके यांच्या संकल्पनेतून बळीराजासाठी अनोखा साकडे!
दुष्काळाच्या सावटात गौरी-महालक्ष्मीचा देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू; स्वयं गौरीकडून महादेवाच्या चरणी बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
तुळजापूर | तुळजापूर नामा
धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथे नगरसेवक मधुकर शेळके यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेली दक्षिण भारतीय धाटणीची महालक्ष्मीची भव्य आरास नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक गौरी-महालक्ष्मी पूजनाला आधुनिक कलात्मकतेची जोड देत साकारलेला हा देखावा यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.

नगरसेवक मधुकर शेळके यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या आरासीत केवळ धार्मिक देखावा न मांडता सध्याच्या शेतकरी परिस्थितीचे प्रतिबिंब दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसमोर निर्माण झालेली आव्हाने आणि शासनाच्या मदतीच्या अपेक्षेने वाट पाहणारा बळीराजा या पार्श्वभूमीवर हा देखावा साकारण्यात आला आहे.

◾गौरीच्या चरणी बळीराजाची व्यथा!

यंदा मराठवाड्यातील शेतकरी अडचणींच्या गर्तेत असताना त्यांच्या व्यथेला धार्मिक श्रद्धेची जोड देण्यात आली आहे. बळीराजाची प्रार्थना स्वयं गौरीमातेच्या माध्यमातून महादेवापर्यंत पोहोचत असल्याचे प्रतीकात्मक दर्शन या देखाव्यातून घडविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा हिरवाई यावी, पावसाची कृपादृष्टी राहावी, कष्टकरी शेतकरी सुखी व्हावा आणि त्याच्या जीवनात समृद्धी नांदावी, अशी भावना या देखाव्यामागे असल्याचे सांगण्यात आले.

◾महाशिवरात्रीपासून गौरी-महालक्ष्मीपर्यंत सांस्कृतिक दर्शन

यापूर्वी महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाचा देखावा, तसेच हिंदू संस्कृतीतील पारंपरिक गौरी-महालक्ष्मी आरास यामधून धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र यंदा तुळजापूर शहरात प्रथमच दक्षिण भारतीय पद्धतीचा महालक्ष्मी देखावा साकारण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

दक्षिण भारतीय मंदिरांच्या कलात्मक रचनेची झलक, आकर्षक सजावट आणि धार्मिक वातावरण यामुळे हा देखावा भाविक व नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

नगरसेवक मधुकर शेळके यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेली ही आरास केवळ सजावटीपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या वेदना, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा यांना एकत्र आणणारा संदेश देणारी ठरत आहे. उत्सवाच्या माध्यमातून बळीराजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
0
8
5
6
3
1



