Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक ३ मध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर

नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या सूचनेनुसार नगरसेवक मधुकर शेळके यांचा पुढाकार; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

0 8 5 6 3 1

प्रभाग क्रमांक ३ मध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर

नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या सूचनेनुसार नगरसेवक मधुकर शेळके यांचा पुढाकार; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या सोयीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष एसआयआर (विशेष सखोल पुनरिक्षण) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या सूचनेनुसार आणि नगरसेवक मधुकर शेळके यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या शिबिरात मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, आवश्यक दुरुस्त्या करणे तसेच नव्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रभागातील सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे शिबिर नगरसेवक मधुकर शेळके यांच्या निवासस्थानासमोर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरास येताना नागरिकांनी आधार कार्ड, २००२ पूर्वीचा जन्म अथवा वयाचा पुरावा (लागू असल्यास), ओळखपत्र आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि प्रभागातील एकही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे नगरसेवक मधुकर शेळके यांनी तुळजापूरनामा न्यजशी बोलताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे