Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अधिक मासानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे तुळजाभवानी चरणी साकडे..

सहकुटुंब घेतले देवीचे दर्शन; आरती, ओटी भरून घेतले आशीर्वाद, विकासकामांचाही घेतला आढावा !

0 8 5 6 2 9

अधिक मासानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे तुळजाभवानी चरणी साकडे..

सहकुटुंब घेतले देवीचे दर्शन; आरती, ओटी भरून घेतले आशीर्वाद, विकासकामांचाही घेतला आढावा !

तुळजापूर : अधिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दि.१३ जून रोजी सहकुटुंब आई तुळजाभवानी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक देवीची आरती करून ओटी भरत श्री तुळजाभवानीच्या चरणी कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जतन, दुरुस्ती आणि संवर्धनाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिराच्या ऐतिहासिक वैभवाला बाधा न आणता सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, प्रगती आणि नियोजनाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

तसेच राज्यभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती जाणून घेत भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि समाधानकारक दर्शन कसे मिळेल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांचीही त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
आई तुळजाभवानीच्या दरबारात जिल्हाधिकाऱ्यांनी सहकुटुंब केलेल्या दर्शनामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अधिक मासात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधांवर विशेष भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीकडे भाविकांसह तुळजापूरकरांचे लक्ष लागले असून, मंदिरातील विकासकामांना गती आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे