Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नागपंचमीला तुळजापुरात पारंपरिक झोक्याचा उत्साह; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्या पुढाकारातून आयोजन; संस्कृती-परंपरेला उजाळा

0 8 5 6 3 1

नागपंचमीला तुळजापुरात पारंपरिक झोक्याचा उत्साह; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्या पुढाकारातून आयोजन; संस्कृती-परंपरेला उजाळा

तुळजापूर : प्रतिनिधी

नागपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका प्रियंकाताई विजय गंगणे यांच्या पुढाकारातून माता-भगिनींसाठी पारंपरिक झोक्याच्या खेळाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिला, युवती तसेच लहान मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नागपंचमीच्या पारंपरिक सणाला आधुनिक काळातही सांस्कृतिक रंग देत महिलांनी पारंपरिक झोक्यावर आनंद घेतला. यामुळे परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण संस्कृती, सण-उत्सवांच्या परंपरा तसेच सामाजिक एकोपा जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष ठरला.यावेळी प्रियंका गंगणे यांनी उपस्थित महिलांना नागपंचमीच्या शुभेच्छा देत, महिलांच्या सहभागातून सांस्कृतिक परंपरांना अधिक बळ मिळते, असे सांगितले. महिलांच्या आनंदासाठी तसेच पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करून नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. नागदेवतेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य व आनंद नांदो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी सपना पांढरे, कविता शेंडगे, पल्लवी कदम, जयश्री कावरे, सोनू वाळके, उषा राठोड, प्रीती सोनवणे, सुनीता कावरे, अश्विनी दहीहंडे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे